#

Advertisement

Saturday, May 31, 2025, May 31, 2025 WIB
Last Updated 2025-05-31T11:51:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महादेव जानकर आता नवीन घरोबा करणार

Advertisement

महायुतीला फारसा फरक पडणार नाही

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकाराणात पुन्हा मोठा भूकंप होणार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू  दिल्लीत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीपासून दूर गेलेले महादेव जानकर आता नवीन घरोबा करणार आहेत. इंडिया आघाडीसोबत जानकर जाणार असल्याची माहिती आहे. मी सध्या महायुती, एनडीएसोबत नाही, असे सूचक विधान जानकर यांनी केले. त्यामुळे जानकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याचं स्पष्ट आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर आता महायुतीला रामराम करणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर जानकर नाराज असल्याचं वारंवार पाहायला मिळाले.आतातर ते नवा घरोबा करण्याच्या तयारीत दिसत आहेत.
आम्ही सध्या महायुती, एनडीएसोबत नाही. मी सध्या नवीन घरोबा करण्याच्या तयारीत आहे, असे सूचक विधान करत महादेव जानकर यांनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे आणि त्याबाबतची घोषणा त्यांनी थेट दिल्लीतून केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच आम्ही इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार आहोत. ज्या ठिकाणी विजयाची खात्री आहे, त्याच जागा मागण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. लवकरच त्याबाबतची चर्चा सुरू होईल, असं जानकर म्हणाले. 

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील युती सरकारसोबत आहेत.आता मात्र आपल्याला दुर्लक्षित केल्याची भावना जानकर यांच्या मनात आहे. आता जानकर महायुतीला रामराम करत आहेत. सध्या महायुतीत इतर पक्षांची गर्दी पाहता, युतीला फारसा फरक पडणार नाही.