Advertisement
बाल कल्याण समितीचा निर्णय
पुणे : सासरच्या जाचाला आणि हुंडा बळी ठरलेली वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाच काय होणार यासाठी सर्वांचं मनं हळवं झालं होतं. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिचा 9 महिन्यांचा चिमुकला निलेश चव्हाण या व्यक्तीकडे होतो. त्याच्या ताब्यातून बाळाची सुटका करून ते बाळ कस्पटे कुटुंबाकडे सोपवण्यात आलं होतं. आईविना पोरकं झालेल्या या चिमुकल्याचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. याचा निर्णय बाल कल्याण समितीने घेतला आहे. वैष्णवी हगवणे हिचा 9 महिन्यांचा बाळाचा सांभाळ त्याची आजी स्वाती आनंद कस्पटे करणार आहे. बाल कल्याण समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती हिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
ट्वीटमध्ये आदिती तटकरे म्हणतात..
पुण्यातील स्व. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा 9 महिन्यांचा मुलगा जनक हगवणे याचा सांभाळ करण्यासाठी बाल कल्याण समितीने त्याच्या आजी व स्व. वैष्णवी हगवणे यांच्या आई श्रीमती स्वाती आनंद कस्पटे यांना योग्य व्यक्ती ( Fit Person) म्हणून नियुक्त केले आहे. याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सामाजिक तपासणी अहवालानुसार श्रीमती स्वाती कस्पटे याच योग्य व्यक्ती असून त्यांचे सामाजिक, भावनिक व कौटुंबिक वातावरण बालकाच्या हितासाठी अनुकूल आहे.
