Advertisement
मंगळवेढा/अहिल्यानगर : माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, बहुजनांचे लोकनेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त यावर्षी फ्लेक्सबाजीला तसेच अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रमांवर भर देण्यात आला. भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहीर जवानांचे हुतात्म्य लक्षात घेत ढोबळे यांनी साधेपणाने वाढदिवस साजरा केला. मतदार संघातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रा. ढोबळे यांनी केलेल्या आवाहनानुसार अनेकांनी शालेय साहित्य भेट म्हणून दिले. यातून ढोबळे यांचे सर्वपक्षीय संबंधी सलोख्याचे असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे बहुजन रयत परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्षा त्यांच्या कन्या कोमल सांळुखे-ढोबळे यांनी वाढदिनी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले होते. त्यानुसार महाराष्ट्रात सर्वत्र समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यावर भर देण्यात आला.
अहिल्यानगर येथे सी.डी.देशममुख विधी महाविद्यालयातर्फे आरोग्य शिबिर, डॉक्टारांचा सन्मान, दहावी, बारावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, अपंग तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन, अनाथ निवासी विद्यार्थ्यांना भोजन तसेच मिठाइ वाटप आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सोलापूर, नाशिक, धाराशिव, कोल्हापूर, सांगली आदी जिल्ह्यांतही बहुजन रयत परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबविले,
दरम्यान, 20 वर्षे मंगळवेढ्याचे लोकप्रतिनिधीत्व केलेल्या ढोबळे यांनी तालुक्यातील शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक पटलावर त्यांनी कोणताही राजकीय वारसा नसताना आपले अस्तित्व निर्माण केलेे. काँग्रेसमधून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेला राजकीय प्रवास आजही निरंतर सुरू आहे.