Advertisement
सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण ; संचालिका अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केले अभिनंदन
भोसरी : इंद्रायणी नगर मधील शाहु शिक्षण संस्था संचलीत ओअॅसिस स्कूलचा १०वी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. ओअॅसिस स्कूल आणि ज्युनिअर कालेजने शंभर टक्के यशाची परंपरा सलग पाच ते सहा वर्षे कायम राखली आहे, यावेळी ही सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत, सर्व शिक्षकांमुळे हे यश मिळाले असल्याचे विद्यालयाच्या संचालिका अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले. त्यांनी दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे काैतूक आणि अभिनंदन केले आहे.
ओअॅसिस स्कूलमधील १०वी परीक्षेत ऋतुजा सरदार हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे, तीला ९० टक्के कुण मिळाले आहेत. तर, द्वितीय क्रमांकावर मयुर बोइनवाड झळकला असून त्यास ८५.४० टक्के गुण मिळाले आहेत. अनिकेत महातो याचा तृत्तीय क्रमांक आला आहे, त्यास ८४.२० टक्के गुण मिळाले आहेत. त्यानंतर अनुक्रमे सिद्धी अवस्थी हिस ८२ टक्के, सिंगा ओथंगा, ८० टक्के, खुशी रावत ८१.२० टक्के, वसुंधरा साळुंखे ८० टक्के, अशीलेशा कवाडे ८० टक्के, प्रतिक मिश्रा टक्के, सिंग मन्षु, ८० यानुसार गुण मिळाले आहेत. स्कूलमधील १५ विद्यार्थ्यांना ७० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. यावेळी संचालक अजय साळुंखे, पर्यवेक्षक विशाल खंदारे, प्राचार्य रामेश्र्वर फिस्के आणि शिक्षक यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे काैतूक केले.
संचालकांच्या कन्येचे यश...
ओअॅसिस स्कूलमध्ये दहावी परिक्षेत ८० टक्के गुणांनी उत्तीर्ण होणारी तसेच गणित विषयामध्ये सर्वाधिक ९६ मार्ग मिळविणारी विद्यार्थिनी वसुंधरा साळुंखे ही याच स्कूच्या संचालीका अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे आणि संचालक अजय साळुंखे यांची कन्या आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच तीने अभ्यास करून यश मिळवले. स्कूल प्रशासनाचे सर्व नियम तीलाही लागू करण्यात आले होते, किंबहुना कडक नियमावली करण्यात आली होती, त्यामुळे तीने मिळवलेले यश हे काैतुकास्पदच आहे, अशी प्रतिक्रिया प्रचार्य रामेश्र्वर फिस्के यांनी व्यक्त केली आहे.