Advertisement
पुणे : ओअॅसिस स्कूलमध्ये दहावी परिक्षेत ८० टक्के गुणांनी उत्तीर्ण होणारी तसेच गणित विषयामध्ये सर्वाधिक ९६ मार्ग मिळविणारी विद्यार्थिनी वसुंधरा साळुंखे ही या स्कूलच्या संचालीका अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे आणि संचालक अजय साळुंखे यांची कन्या आहे. तीन मिळविलेल्या यशाबद्दल एक आई म्हणून अॅड. कोमलताई यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
अॅड. कोमलताई म्हणतात की, आजचा दिवस एक स्वप्न सत्यात उतरल्यासारखा वाटत आहे. आज दहावीचा निकाल लागला आणि आमच्या घरात आनंदाचे, समाधानाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. कारण, वसुंधरा हिने दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवल. वर्षभर अभ्यास, टेन्शन, वेळेवर उठणे, अभ्यासाला बसणे, ही तिची शिस्तबद्ध मेहनत आज तिच्या निकालातून दिसून आली. आज, तिने फक्त स्वत:चे नाही तर आमचे देखील स्वप्न पूर्ण केले. याचा जास्त आनंद आहे. आज, पालक म्हणून आम्हाला फक्त तिच्या गुणांचाच नाही तर तिच्या जिद्दीचा, तिच्या प्रामाणिक प्रयत्नांचा आणि तिच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा अभिमान वाटतो.
खरंतर दहावी ही केवळ परीक्षा नसते, ती आयुष्याचा टर्निंग पॉइंट असते. ही पहिली पायरी असते जिथून स्वप्नांची, उद्दिष्टांची आणि यशाची खरी सुरुवात होते. या पहिल्या पायरीवर आमच्या लेकीने आपल्या मेहनतीने, चिकाटीने आणि आत्मविश्वासाने आज पहिले पाऊल ठामपणे टाकले आहे. आई-वडील म्हणून आमचे स्वप्न होते की मुलीने शिकावे, मोठे व्हावे, स्वतःचे नाव कमवावे. आज त्या दिशेने तिने पहिले यशस्वी पाऊल टाकले. वसू, खूप मोठी हो, कीर्तिवंत हो! अशीच जिद्द ठेव. अजून खूप काही मिळवायचे आहे आयुष्यात. ही तर सुरुवात आहे. खरे यश अजून पुढे वाट पाहते आहे. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आमची भक्कम साथ आणि आशीर्वाद कायम तुझ्या सोबत असेल.