#

Advertisement

Friday, May 30, 2025, May 30, 2025 WIB
Last Updated 2025-05-30T10:52:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

वैष्णवी मृत्यू प्रकरण : निलेश चव्हाण याला नेपाळमधून अटक

Advertisement

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. फरार निलेश चव्हाण याला नेपाळ बॉर्डरवरुन अटक करण्यात आली आहे. कस्पटे कुटुंबियांना निलेश चव्हाण याने धमकवल्याचा आरोप आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. वैष्णवी हगवणेनं 16 मे 2025 रोजी आत्महत्या केली. सुनेचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे,  सुशील हगवणे, लता हगवणे, करिष्मा हगवणे आणि सह सर्वांना अटक करण्यात आली. तर, आरोपी निलेश चव्हाण हा फरार होता. नेपाळ बॉर्डरवरून चव्हाण याला बावधन पोलिसांनी  अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 23 मे पासून निलेश चव्हाण फरार होता. निलेश चव्हण हा वैष्णवीच्या नणंदेचा विकृत मित्र आहे.
वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात कस्पटे कुटुंबीयांना बाळ घेण्यासाठी गेले असता बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप  निलेश चव्हाण याच्यावर आहे. निलेश चव्हाण याच्या विरोधता स्टँडिंग वॉरंट अखेर जारी करण्यात आले होते. निलेश चव्हाणनं धमकी दिल्यापासून कस्पटे कुटुंबाला जिवाची भीती वाटत होती. कारण निलेश चव्हाण हा विकृत आहे तो काहीही करू शकतो. हे संपूर्ण महाराष्ट्रासमोर आलंच आहे. त्यामुळे त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली होती.
निलेश चव्हाण हा स्वताच्या पत्तीचा छळ करत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आलीय. स्पाय कॅमे-यांच्या सहाय्यानं स्वत:च्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ काढत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय..या प्रकरणी त्याच्यावर 2019 मध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. नराधम हगवणे कुटुंबाप्रमाणेच निलेश चव्हाणकडून देखील त्याच्या पत्नीचा छळ करत होता.