Advertisement
मुंबई वरळी समुद्र किनाऱ्यालगत इमारत
मुंबई : मायानगरीतील एक महागडा सौदा झाला आहे. हा देशातील सर्वात महागडा सौदा मानण्यात येत आहे. दक्षिण मुंबईत वरळी परिसरातील समुद्रालगतच्या इमारतीमधील डुप्लेक्स फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. ही दक्षिण मुंबईतील अजून एक महागडी डील ठरली आहे. खरेदीदाराने त्यासाठी एकूण 703 कोटी रुपये मोजले. त्यात रजिस्ट्रीसाठीच 63.9 कोटी रुपये मोजले. वरळी समुद्र किनाऱ्या लगतच्या Naman Xana मधील दोन फ्लॅटची विक्री झाली आहे. 40 मजली इमारतीमधील 32 व्या आणि 35 व्या मजल्यावरील या दोन फ्लॅटची विक्री भारतातील सर्वात महागडी ठरली आहे. दिग्गज फार्मा कंपनी USV India च्या अध्यक्ष लीना तिवारी यांनी हे दोन्ही फ्लॅट खरेदी केले आहेत.
वरळी बिंदू माधव ठाकरे चौकातील 40 मजली नमन-झाना या इमारतील 32 आणि 35 मजल्यांवर हे दोन फ्लॅट्स असून 22,572 चौरस फूट आकाराचे आहे. फ्लॅट्ससाठी प्रति चौरस फूट दर 2.83 लाख रुपये असून या 22,572 चौरस फूट च्या फ्लॅट साठी आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम मोजण्यात आली आहे. 639 कोटी रुपये फ्लॅटसाठी तर 63.9 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि जीएसटीसाठी देण्यात आल्याचे समोर येत आहे.
इकोनॉमिक्स टाईम्सनुसार, लीना तिवारी यांनी देशातील सर्वात महागडी मालमत्ता खरेदी करून अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे. लीना तिवारी यांची गणना ही देशातील श्रीमंत महिलांमध्ये करण्यात येते. त्यांचे आजोबा विठ्ठल बालकृष्ण गांधी यांनी 1961 मध्ये ही कंपनी स्थापन केली होती. 30 हजार कोटींची मालकीण असलेल्या लीना तिवारी या समाज माध्यमांपासून चार हात दूर राहतात.