#

Advertisement

Wednesday, May 28, 2025, May 28, 2025 WIB
Last Updated 2025-05-28T12:26:58Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

थेट गृहराज्यमंत्र्यांनीच टाकली डान्स बारवर धाड

Advertisement

महाराष्ट्रात  20 वर्षानंतर सर्वात मोठी कारवाई

मुंबई : महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी आहे. असे असताना देखील महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये छुप्यापद्धतीने डान्स बार सुरु आहेत. डान्स बार विरोधात महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईतील डान्स बारवर थेट गृहराज्यमंत्र्यांनी धाड टाकली आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतील वाशी इथल्या अनधिकृत डान्स बारवर धाड टाकली.  'द रेस' अस या डान्सबारचे नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बार वर धाड टाकली.  या बारमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये बारगर्ल अश्लिल नृत्य करत असल्याचे दिसून आले. यावेळी 40 बारगर्ल आणि 6 वेटर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी एपीएमसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
महाराष्ट्रात अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे डान्स बार सुरु असतील तर ते तातडीने बंद करावेत. अन्यथा कडक करावाई केली जाईल अशा इशारा देखील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे.  2005 मध्ये माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महाराष्ट्रातील डान्स बार बंद केले.  आर. आर. पाटील यांनी असाच प्रकारे डान्सबार छापेमारी केली होती.  डान्सबारमुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे. यामुळे कायद्याने डान्स बारवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे डान्स बार सुरु आहेत.