Advertisement
पाकिस्तानच्या 7 पिढ्यांना लक्षात राहिल असा बदला
दिल्ली : जम्मू - काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 22 एप्रिल 2025 ला हल्ला करुन 27 पुरुषांची हत्या केली होती. या दहशतवादी हल्ल्यानंतर आक्रमक झालेला भारताने आपला बदला पूर्ण केला. बुधवारी रात्री 7 मे 2025 ला मध्यरात्री भारतीय सैनिकांनी पाकिस्तानची झोप उडवली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदल्यात भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये ऑपरेशन सिंदूर घडवलं. भारताने एकूण नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करुन 120 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. आता पाकिस्तानमधून ऑपरेशन सिंदूरचे विनाशकारी व्हिडीओ समोर आले आहेत. भारताने घेतलेल्या हा बदला पाकिस्तानमधील सात पिढ्यांना लक्षात राहिल असा आहे. भारतीय लष्कराने जैश-ए-मोहम्मद आणि लष्करच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य केलं.
रात्री उशिरा हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानच्या लोकांनी व्हिडीओ बनवले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मोठा हल्ला केल्याची पुष्टी केली. बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद भागात हे हल्ले करण्यात आले. भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे की, लक्ष्य फक्त दहशतवादी तळ होते आणि कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला झाला नव्हता.
