#

Advertisement

Wednesday, May 7, 2025, May 07, 2025 WIB
Last Updated 2025-05-07T11:44:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भारताच्या रणरागिणींचा सार्थ अभिमान : अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे

Advertisement


ऑपरेशन सिंदूरमध्ये महिला अधिकाऱ्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका 

पुणे : भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय लष्काराने बदला घेतला. पहलगाममध्ये ज्या भारतीय महिलांच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले त्या दहशतवाद्यांना खात्मा करण्यामध्ये भारताच्या रणरागिणीही अग्रेसर राहिल्या, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. पाकिस्तानला लष्करी भाषेत उत्तर देण्यात आमच्या देशाच्या महिलाच पुरेशा आहेत, असा संदेशही ऑपरेशन सिंदूरद्वारे दिला गेला आहे, अशी प्रतिक्रिया बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केली. 
भारताच्या नारी शक्तीने ऑपरेशन सिंदूरमार्फत हल्लेखोरांना धडा शिकवला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याने जी काही पत्रकार परिषद घेत या ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली, त्यामध्ये भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकारी समोर आल्या आणि आत्मविश्वासाने बोलल्या. हे पाहून अख्ख्या देशाची मान अभिमानाने उंचावली असेल. पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या या भारताच्या लेकीच पुरेषा आहेत. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी मंगळवारच्या ता. ६ मे या दिवशीच्या मध्यरात्री नेमके काय घडले, याबाबत माहिती दिली. दहशतवद्यांना आधार देणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्य कशा प्रकारे संपवत आहे, हे देखील या दोघींनी सांगितले. ऑपरेशन सिंदूरनंतर या दोघीही भारतातील नारी शक्तींचे प्रतीक ठरल्या. कर्नल सोफिया आणि विंग कमांडर व्योमिका या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी भारतीय लष्करातील महिलांची ताकद आणि त्या काय पराक्रम करू शकतात, हे जगासमोर ठेवले आहे, या रणरागिंनींना माझा सलाम. या  महिला अधिकाऱ्यांनी भारतीय सैन्याची ताकद जगासमोर मांडली. ऑपरेशन सिंदूर हे जगासाठी शक्ती, त्याग आणि शक्तीचे प्रतीक ठरले आहे, असेही अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे  यांनी नमूद केले.