#

Advertisement

Wednesday, May 7, 2025, May 07, 2025 WIB
Last Updated 2025-05-07T12:18:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

एक हॅमर मिसाईल किती रुपयांना येते ?

Advertisement

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्यासाठी वापर 
दिल्ली : भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. या ऑपेरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानातील 4 आणि जम्मू काश्मीरमधील 5 म्हणजेच एकूण 9 आतंकवादी ठेक्यांना लक्ष केलं. इंडियन आर्मी, इंडियन एअर फोर्स आणि इंडियन नेवीने एकत्र मिळून ऑपरेशन सिंदूरमध्ये हॅमर मिसाईलचा वापर केला. 
हॅमर मिसाईल ही एक एक्यूरेट गाइडेड मिसाईल असून यामुळे अतिशय सहजपणे एयर टू ग्राउंडवर अटॅक केला जाऊ शकतो. भारताने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरला राबवत असताना  हॅमर मिसाईलचा उपयोग केला.  हॅमर मिसाईल ही आधुनिक लढाऊ विमान असलेल्या राफेलला फिट होते. हॅमर मिसाईलची किंमत ही 85,000 यूरो पासून 1.5 लाख यूरोपर्यंत म्हणजेच 70 लाख रुपयांपासून ते 1.2 कोटी रुपयांपर्यंत आहे. हॅमर ही एक फ्रांसीसी मिसाईल असून ज्याचं संपूर्ण नाव हे Highly Agile Modular Munition Extended Range मिसाईल असं आहे. ही मिसाईल 50 ते 70 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर हल्ला करू शकते.
हॅमर मिसाईलमध्ये जीपीएस सुद्धा असतं. यात लेजर गायडंस सुद्धा असते, ज्यामुळे ही अचूकपणे आणि लांब अंतरावर लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे. या मिसाईलवर इलेक्ट्रॉनिक जॅमिंगचाही परिणाम होत नाही. हे विशेषतः बंकर नष्ट करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. राफेल लढाऊ विमान एका वेळी ६ हॅमर मिसाईलसह उड्डाण करू शकते. म्हणजेच एकावेळी 6 वेगवेगळ्या ठिकाणांना निशाणा बनवले जाऊ शकते. वर्ष 2020 मध्ये भारताने हे मिसाईल खरेदी केलं होतं.