#

Advertisement

Wednesday, May 7, 2025, May 07, 2025 WIB
Last Updated 2025-05-07T12:08:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विंग कमांडर व्योमिका सिंह आहेत तरी कोण?

Advertisement

दिल्ली : पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केला. सात मे रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. अवघ्या 25 मिनिटांच्या कारवाईत तब्बल 90 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ऑपरेशन सिंदूर असं या कारवाईला नाव देण्यात आलं होतं. ऑपरेशन सिंदूर नेमकं कसं घडलं, याची सविस्तर माहिती विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, तपास यंत्रणांनी दिलेल्या पुराव्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले. पाकिस्तानच्या मुजफ्फराबादमध्ये लष्कराच्या ट्रेनिंग सेंटरवर हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी येथूनच प्रशिक्षण घेतले होते. दहशतवाद मुळापासून उपटून टाकण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. बरनाला कॅम्पदेखील उद्ध्वस्त करण्यात आला. सियालकोटमध्ये महमूना कॅम्पदेखील नष्ट करण्यात आला. 

कोण आहे व्योमिका सिंह?
व्योमिका सिंह ही लष्करात सामील होणारी कुटुंबातील पहिली व्यक्ती आहे. त्या भारतीय हवाई दलात हेलीकॉप्टर पायलट म्हणून कार्यरत होत्या. 18 डिसेंबर 2019 साली फ्लाइंग ब्रँचमध्ये स्थायी कमिशन मिळालं होतं. विंग कमांडर व्योमिका सिंह यांना 2,500 पेक्षा जास्त तास विमान हवेत उडवण्याचा अनुभव आहे. त्यांनी जम्मू-काश्मीर आणि पूर्वोत्तरसह अनेक कठिण परिसरात चेतक आणि चीता या हेलीकॉप्टरचे संचालन केले. व्योमिका सिंह यांनी अनेक बचाव अभियनात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्या व्यतिरिक्त, विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी अनेक मिशनमध्ये भाग घेतला होता. 2021 मध्ये माउंट मणिरंगवर तिन्ही दलाच्या सर्व महिला गिर्यारोहक या अभियानात सामील होत्या. हे 21,650 फुट उंचीवर स्थित आहे. त्यांच्या या प्रयत्नाला वायू सेनाच्या प्रमुखांसह वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी मान्यता दिली होती.