Advertisement
पाकिस्तानचं गाऱ्हाणं ऐकण्यास अमेरिकेचा नकार
दिल्ली : भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात खळबळ माजली आहे. पाकिस्तान वारंवार भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दरवेळी पाकिस्तानवर तोंडावर आपटण्याची वेळ येत आहे. यादरम्यान पाकिस्तान सतत अमेरिकेकडे मदतीसाठी याचना करत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पाहता अमेरिकेने या संपूर्ण घटनाक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस आम्ही दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी आवाहन करु शकतो, पण आम्ही युद्धात सहभागी होऊ शकत नाही असं स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस आम्ही दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी आवाहन करु शकतो असं फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. पण आम्ही हस्तक्षेप करणार नाही, कारण ते आमचं काम नाही असं सांगितलं आहे. "आम्ही युद्धात सहभागी होऊ शकत नाही, कारण हे आमचं काम नाही आणि आम्ही ते नियंत्रित करु शकत नाही," असं ते म्हणाले आहेत. ते म्हणाले की, "अमेरिका भारताला शस्त्रं सोडून देण्यास सांगू शकत नाही. आम्ही पाकिस्तानी नागरिकांनाही सांगू शकत नाही. आम्ही राजनैतिक माध्यमातून यावर तोडगा काढू शकतो. फक्त आम्हाला आशा आहे की, सध्याच्या युद्धाचं रुपांतर मोठ्या किंवा अण्वस्त्र युद्धात होऊ नये. पण सध्या तरी असं होईल असं आम्हाला वाटत नाही".
