#

Advertisement

Wednesday, May 21, 2025, May 21, 2025 WIB
Last Updated 2025-05-21T12:14:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राजा शिवाजी सिनेमाचा FIRST LOOK रिलीज

Advertisement

रितेश देशमुख दिग्दर्शित : मराठी अभिनेते प्रमुख भूमिकेत

मुंबई : छावा सिनेमानंतर आता मराठा साम्राज्याशी संबंधित आणखी एक सिनेमा सिनेरसिकांना पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या कहाणींवर आधारित 'राजा शिवाजी' नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहे. बुधवारी (21 मे 2025) 'राजा शिवाजी' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमामध्ये चार मराठी अभिनेते मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते हे मराठमोळे कलाकार सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. या कलाकारांच्या व्यतिरिक्त सिनेमामध्ये अभिषेक बच्चन,संजय दत्त, भाग्यश्री, फरदीन खान आणि जिनिलिया देशमुख यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
रितेश देशमुखसह सिनेमातील सर्वच कलाकारांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवर 'राजा शिवाजी' (Raja Shivaji Movie) सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. सिनेमामध्ये रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. सिनेमातील रितेश देशमुखचा पहिला लुक रिलीज करण्यात आलाय. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित राजा शिवाजी सिनेमा पाहण्यासाठी सिनेरसिक आतुर झाले आहेत. पण प्रेक्षकांना वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.