#

Advertisement

Saturday, June 28, 2025, June 28, 2025 WIB
Last Updated 2025-06-28T12:07:54Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

प्राडाच्या कोल्हापुरी चप्पलची किंमत 1.2 लाख ?

Advertisement

कोल्हापुर : इटलीच्या लग्जरी फॅशन ब्रँड प्राडाच्या नविन कलेक्शनमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. प्राडाने अलीकडेच मिलानमध्ये आपले Men's Summer 2026 कलेक्शन सादर केलं. या शोमध्ये मॉडेल्सच्या पायात जी चप्पल दिसली ती हुबेहुब भारतातील प्रसिद्ध 'कोल्हापुरी चप्पल' सारखी होती. या चपलेची किंमत जवळपास 1 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. तर भारतात अशीच चप्पल सुमारे 400 ते 500 रुपयाला सहज मिळते. मात्र या ब्रँडिंगनंतर या कंपनीने कोल्हापूरचं नावच घेतलं नाही याचा कोल्हापुरकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर हा विषय उचलून धरत कोल्हापुरी चप्पल हा कोल्हापूरचाच ब्रँड हवा अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
प्राडा म्हणजे जगभरातल्या सेलिब्रिटींचा ब्रँड. एकदा, दोनदा नव्हे तर डझनभर मॉडेल्स चपला घालून रॅम्पवर चालले. त्यांनी कोल्हापुरी चप्पल वापरली मात्र कोल्हापूरकरांना त्याची साधी कल्पनाही दिली नाही. कोल्हापूरचा कारागिर आजही कोल्हापूरच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये चपला तयार करतोय. त्याच्याच या चप्पलची कॉपी केली प्राडानं आणि ओरिजनल आयडिया असलेल्या कोल्हापूरकरांना काय मिळालं. एक छदामसुद्धा नाही आणि मानसुद्धा नाही. 

कोल्हापुरी चप्पलेचा इतिहास...
कोल्हापुरी चप्पल आपल्याकडे बाराव्या-तेराव्या शतकापासून वापरली जाते. कोल्हापुरी चप्पल म्हणजे महाराष्ट्राची ओळख आणि शान. कोल्हापुरी चप्पल चामड्यापासून बनवलेली असते, म्हणूनच ती पायातली उष्णता शोषून घेते. कोल्हापुरी चप्पल पायात असली की पाय थंड राहतात. पायात घालायला हलकी आणि चालायला वेगवान अशी ही चप्पल. कोल्हापूरी चप्पल बनतेच अशी की ती वर्षानुवर्षं तुमच्या पायाची पाठ सोडत नाही. शाहू महाराजांनी या कोल्हापुरी चप्पलेला प्रोत्साहन दिलं आणि कुशल कारागिर तयार झाले.