#

Advertisement

Saturday, June 28, 2025, June 28, 2025 WIB
Last Updated 2025-06-28T11:59:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बार्टीच्या अर्थसहाय्य योजनेस मुदतवाढ

Advertisement

ऍड. कोमलताई  साळुंखे-ढोबळे यांची माहिती 

पुणे, दि. २९ - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट-ब २०२४ पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अनुसुचित जातीतील उमेदवारांना बार्टीकडून मुख्य परीक्षेसाठी दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्य योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमलताई  साळुंखे-ढोबळे यांनी दिली. 
या योजनेनुसार सदर परीक्षा देत असलेल्या उमेदवाराला एकरकमी १० हजार रुपये देण्यात येणार आहेत. यासाठी बार्टीने १६ जूनला बार्टीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित केली होती. त्यानुसार या योजनेसाठी इच्छूक विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म भरायचा होता. मात्र, या गुगल फॉर्ममध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे उमेदवारांना हा फॉर्म भरता येत नव्हता. त्यामुळे या योजनेत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी आता १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. https://forms.office.com/r/nrHvU64dHA संकेतस्थळावर उपलब्ध फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्यासोबत आवश्‍यक कागदपत्रांची साक्षांकीत प्रत बार्टीच्या पत्त्यावर पाठवायची आहे. या प्रतिशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, असेही ऍड. कोमलताई  साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.