Advertisement
मुंबई : धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना 2003 मध्ये नीत अंबानी यांनी केली होती. मुलांचे शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी हे स्कूल ओळखले जाते. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी या स्कूलची उपाध्यक्ष आहे.
धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल IGCSE, ICSE आणि IBDP कार्यक्रमांच्या मदतीने बालवाडी ते 12 वी पर्यंतच्या मुलांना उत्कृष्ट शिक्षण देते. त्याचबरोबर हे स्कूल मुलांना शिक्षणापलीकडे जाऊन सर्वांगीण विकासावर आणि त्यांना चांगले मानव आणि प्रौढ नागरिक बनवण्यावर लक्ष देते.
2024 मधील शैक्षणिक वर्षात, बालवाडीसाठी धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी 1,400,000 ते 12 वी साठी 20,00,000 पर्यंत आहे. या फीमध्ये मुलांना पुस्तके, स्टेशनरी, गणवेश आणि वाहतूक यासारख्या आवश्यक वस्तूंचा देखील समावेश आहे. तसेच स्कूलमधील गरजू मुलांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देखील दिली जाते.
धीरुभाई अंबानी यांच्या स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज जगभरात प्रसिद्ध आहेत. ज्यामध्ये आकाश अंबानी, ईशान धवन आणि श्लोका मेहता, खुशी कपूर, सारा अली खान, इब्राहिम अली खान, सुहाना खान, आर्यन खान, सारा तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर, न्यासा देवगन, अनन्या पांडे यासारख्या अनेक सेलिब्रिटीच्या मुलांनीही येथे शिक्षण घेतले आहे.
किती आहे वार्षिक फी?
एलकेजी ते सातवी पर्यत 1,70,000 रुपये. तर आठवी ते 10 पर्यंत 5,90,000 रुपये. अकरावी आणि बारावी पर्यंत 9,65,000 रुपये फी आहे. अंबानींच्या या स्कूलमध्ये मुलांना देण्यासाठी खूप काही आहे. जसे की संगणकांसह विज्ञान प्रयोगशाळा आणि वर्गखोल्या आहेत. जिथे मुलांना नवीन गोष्टी शिकता येतात. त्यासोबतच मुलांना खेळण्यासाठी मोठे मैदान आणि ग्रंथालय देखील आहे.
