Advertisement
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केलेले आरोप सत्य असल्याचे समोर
मुंबई : राज्यातील लाडकी बहीण योजनेला पात्र महिलांना मे महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र यासाठी माझ्या खात्याचे पैसे लाडकी बहीणसाठी वर्ग करण्यात आले. पूर्वीदेखील 7 हजार कोटी वर्ग करण्यात आले होते. याची मला पुसटशी कल्पना नसल्याचे धक्कादायक विधान मंत्री संजय शिरसाठी यांनी केलंय. या खात्याची आवश्यकता नसेल तर हे खाते बंद करा. दलित मागासवर्गीय काय करायचं बघू अशा शब्दात त्यांनी नाराजीदेखील व्यक्त केलीय. याला अन्याय म्हणा, कट म्हणा, असे का करताय कळत नाही. फायनान्स विभाग मनमानी करतंय. सहन करण्याची मर्यादा आहे. सगळं कट करून टाका. कशाला हवी शिष्यवृत्ती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. या खात्याचा निधी वर्ग करता येत नाही. कट करता येत नाही. फायनान्स वाले जास्त डोके चालवत असेल तर हे आम्हाला मान्य नसल्याचे संजय शिरसाट म्हणाले होते. मला हे पटलेलं नसून मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलेन. माझ्या खात्यावर याचा निश्चित परिणाम होईल. एक दिवस अशी गळती लागेल की काम होणार नाही, असेही शिरसाट यांनी सांगतिले.
याबाबत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी यापूर्वीच राज्य शासनावर टीका करताना. लाडक्या बहीण योजनेसाठीचा मे महिन्यातील हप्त्याचे नियोजन करण्याकरिता आदिवासी समाज कल्याण समितीचा निधी शासनाने वळविल्याचा आरोप शासनावर केला होता. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केलेले आरोप सत्य असल्याचे यानिमीत्ताने समोर आले आहे.
