#

Advertisement

Monday, June 9, 2025, June 09, 2025 WIB
Last Updated 2025-06-09T17:12:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजित पवारांनी शरद पवाराच्या शेजारी बसणं टाळलं

Advertisement

पुणे : पुण्यात एआय तंत्रज्ञानाशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अजित पवार आणि शरद पवार हे उपस्थित होत्. यावेळी स्टेजवर दोन्ही नेत्यांची बैठकव्यवस्था ही एकमेकांच्या शेजारी करण्यात आली होती. मात्र, अजित पवारांनी शरद पवाराच्या शेजारी बसणं टाळलं. अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी असलेली आपली नेमप्लेट उचलली आणि तिथे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची नेमप्लेट ठेवली. यामुळे बाबासाहेब पाटील हे शरद पवारांच्या शेजारी बसले आणि अजित पवार हे पाटील यांच्या डाव्या बाजुला बसले. अजित पवारांच्या या कृतीची चर्चा आता सर्वत्र होत आहे.
याआधीही अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं होतं. २३ जानेवारी २०२५ रोजी याच व्हीएसआयच्या मंडपात अजित पवारांनी बैठक व्यवस्था बदलली होती. आता सहा महिन्यांनी याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

सुप्रिया सुळेंनेही दिले होते संकेत
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते की, हा फक्त माझाच निर्णय नाही. याबाबत पक्षातर्फे निर्णय घेतला जाईल. गेल्या सहा दशकांपासून महाराष्ट्राने शरद पवार यांच्या कामाची पद्धत पाहिलेली आहे. शरद पवार जो निर्णय घेतात किंवा जे मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होते. त्यामुळेच पक्षाचा जो काही निर्णय असेल तो पक्षातील शेवटच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच घेतला जाईल. कोणताही निर्णय आम्ही आतापर्यंत एकाधिकारशाहीने घेतलेला नाही. यापुढेही कोणताही एकर्तफी निर्णय होणार नाही.