#

Advertisement

Monday, June 9, 2025, June 09, 2025 WIB
Last Updated 2025-06-09T12:12:33Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात झेप घेण्यासाठी सज्ज

Advertisement

भारत आणि नासा यांच्यातील सहकार्याने अ‍ॅक्स-४ मोहिम

दिल्ली : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला अ‍ॅक्सिओम स्पेसच्या अ‍ॅक्स-४ मोहिमेसाठी अंतराळात जाणार आहेत. शुभांशू शुक्ला १० जून रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:५२ वाजता अंतराळ स्थानकासाठी रवाना होणार आहेत. त्यानंतर ते ११ जून २०२५ रोजी ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणार आहेत. शुभांशू शुक्ला यांच्या या मोहिमेमुळे राकेश शर्मा सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने अवकाशात गेले होते तो क्षण ताजा झाला आहे.
शुभांशू शुक्ला हे भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन आहेत, तसेच ते गगनयान मोहिमेतील चार अंतराळवीरांपैकी एक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये अमेरिका दौऱ्यावर गेले होते, त्यावेळी त्यांनी अ‍ॅक्स-४ मोहिमेसाठी शुक्ला यांची निवड केली होती. अ‍ॅक्स-४ ही मोहीम भारत आणि नासा यांच्यातील सहकार्याने राबविले जात आहे. या आभियानासाठी शुभांशू यांनी स्पेसएक्स आणि अ‍ॅक्सिओम स्पेसकडून विशेष प्रशिक्षण देखील घेतले आहे. 
शुभांशू शुक्ला यांच्यासोबत इतर काही सहकारी अंतराळात जाणार आहेत. या टीमच्या प्रक्षेपणाची पूर्ण झाली आहे. अ‍ॅक्स-४ क्रू आणि स्पेसएक्स टीमने प्रक्षेपणापूर्वी सराव केला आहे. यावेळ फाल्कन ९ रॉकेटची स्टॅटिक फायर चाचणी देखील करण्यात आली. अ‍ॅक्स-४ मिशन १० जून रोजी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होणार आहे.

अ‍ॅक्स-४ मिशन काय आहे?
अॅक्स-४ मिशन हे स्पेसएक्सचे ५३ वे ड्रॅगन मिशन आहे आणि १५ वे मानवी अंतराळ अभियान आहे. या मोहिमेत शुभांशू शुक्ला यांच्यासह कमांडर पेगी व्हिटसन (यूएसए), मिशन स्पेशालिस्ट स्लाव्होस उजनांस्की (पोलंड) आणि मिशन स्पेशालिस्ट टिबोर कापू (हंगेरी) हेही अंतराळात जाणार आहेत. ही मोहीम आधी ८ जून रोजी सुरू होणार होती पण खराब हवामानामुळे ती १० जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.