#

Advertisement

Wednesday, June 18, 2025, June 18, 2025 WIB
Last Updated 2025-06-18T15:15:24Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मतभेद बाजूला ठेवून एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जावू

Advertisement

राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांचे प्रतिपादन 

मंगळवेढा : भाजपसारखा कमी बोलणारा पक्ष आपल्याला समजून घ्यावा लागेल. आपसातील मतभेद बाजूला ठेवत एकसंघपणे येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करूया, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले.

मंगळवेढा येथील शिशुविहार येथे राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांच्या सत्कार समारंभासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते अनिल सावंत, राहुल शहा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, संतोष रंदवे, काँग्रेसचे मतदारसंघ अध्यक्ष मारुती वाकडे, राजेंद्र चेळेकर आदी  उपस्थित होते.

लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, मंगळवेढा तालुक्यामध्ये बहुजन विचाराचा पगडा आहे. पुरोगामी विचारामुळे अनेक वर्षी याठिकाणी खासदार व आमदार झाले होते. वसंतनाना देशमुख यांना जयंत पाटील व मोहिते-पाटील यांनी दिलेली संधी योग्य आहे. आगामी काळातील निवडणुकांमध्ये आपल्या जवळचा जिल्हाध्यक्ष या नात्याने या भागांमध्ये अधिक लक्ष केंद्रित करून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी याचा फायदा होणार आहे. निवडणुकीमध्ये निवडून येण्याचा निकष विचारात घेतला जाईल. त्यामुळे पक्षाची बांधणी करत असताना ज्या कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी मिळणार नाही. त्यांना पक्षीयस्तरावर काम करण्याची संधी द्यावी, अशी सूचना त्यांनी दिली.

अनिल सावंत म्हणाले की, विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या चुका झाल्या आहेत, त्या बाजूला ठेवत आगामी काळातील निवडणुकांमध्ये आपण पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करूया, असे सांगितले. यावेळी प्रांतिक सदस्य राहुल शहा, मारुती वाकडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माणिक गुंगे, संगीता कट्टे, स्मिता अवघडे, सुरेश कट्टे, भीमाशंकर कवचाळे, दादासाहेब पवार, बबन द्वावरे, अजिंक्य बेद्रे, पांडुरंग जावळे, पांडुरंग माळी, प्रकाश खंदारे, पंकज चव्हाण, परमेश्वर लेंडवे, जमीर इनामदार उपस्थित होते.