#

Advertisement

Monday, June 2, 2025, June 02, 2025 WIB
Last Updated 2025-06-02T11:38:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

रायगडावरील उत्खनन : शिवकालीन रहस्यं उलगडणार

Advertisement

रायगड : दुर्गराज रायगडावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने सुरू असलेल्या उत्खननादरम्यानएक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज अर्थात सौम्ययंत्र म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शिवकालीन होकायंत्र सापडले आहे. या शोधामुळे रायगडाच्या बांधकामात तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतींचा वापर झाल्याचा महत्वपूर्ण पुरावा हाती लागला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फेसबुक  पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. 

खगोलशत्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते, याबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा सापडला आहे. दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेमध्ये गडावर प्राचीन ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र (Astrolabe) हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे. प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी वापरण्यात येणारे महत्वाचे यंत्र म्हणजे 'Astrolabe'. याला ‘यंत्रराज’ या नावानेही ओळखतात. अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यांसारख्या गोष्टींचा अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून या यंत्राचा वापर केला जात असे. दुर्गराज रायगडाचे बांधकाम करीत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे.

दुर्गराज रायगडाचे बांधकाम करताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे. या अमूल्य ठेवल्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असं रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.