Advertisement
आतापर्यंत 19 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने निकषानुसार छाननी करण्यास सुरुवात केली आहे. निकषात न बसणाऱ्या आतापर्यंत 19 लाखांहून अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. आता राज्य सरकारकडून लाभार्थींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या मर्यादेची तपासणी सुरू केली आहे. त्यासाठी राज्याच्या वित्त विभागाकडून केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
या प्रस्तावानंतर केंद्राचा अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या योजनेतील खरे लाभार्थ्यींची निश्चिती करण्यास सोप्पे जाणार आहे. अर्जदारांनी मोठ्या उत्पन्न मर्यादा ओलांडल्यास त्या लाडकी बहिण योजनेतून अपात्र होणार आहेत. सध्या लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटी 65 लाभ लाभार्थी महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी अडीच कोटी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात दरमहिन्याला 1500 रुपये जमा होतात. एप्रिलपर्यंत 9 हप्ते म्हणजेच 13 हजार 500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यातील 19 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे. उत्पन्न मयदिची अट योग्य रीतीने पाळली जात आहे का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यासाठी राज्यातील अर्थ विभागाने केंद्र सरकारकडे आयकर विभागाकडून या लाभार्थीची उत्पन्न पडताळणी करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या आयटीआरची छाननी होणार आहे. या अहवालानंतर मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत.
