#

Advertisement

Wednesday, June 4, 2025, June 04, 2025 WIB
Last Updated 2025-06-04T11:52:01Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्रातील बड्या नेत्याचे नाव समोर......

Advertisement

निलेश चव्हाण पिस्तुल प्रकरण 

पुणे : वैष्णवी हुंडाबळी गुन्ह्यातील पिस्तुलबाज निलेश चव्हाण याला अटक झाली आहे.  निलेश चव्हाण पिस्तुल प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.  थेट मंञालयातूनच शस्र परवाना मंजूर झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय.  निलेश चव्हाण पिस्तुल प्रकरणात महाराष्ट्रातील बड्या नेत्याचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांनी प्रारंभी त्याला शस्र परवाना नाकारला होता पण या त्याने थेट मंञालयातून शस्र परवाना मंजूर करवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर निलेश चव्हाणला गृहराज्य मंत्र्यांच्या सुनावणीत शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाण यांने पुणे पोलिसांकडे परवान्यासाठी मागणी अर्ज केला होता.  सुरक्षेच्या कारणास्तव पुणे पोलिसांनी शस्त्र परवानगी नाकारली होती.  यानंतर निलेश चव्हाणने गृह विभागात अपील केले होते.  तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे  झालेल्या सुनावणीत निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्याचा प्रस्ताव मान्य झाला.   मात्र, त्यावेळी  गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयाला निलेश चव्हाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. निलेश चव्हाण याने 13 डिसेंबर 2021 रोजी पुणे पोलिसांकडे शस्र परवानासाठी अर्ज केला होता.  पुणे पोलिसांनी मार्च 2022 मधे अर्ज नामंजूर केला. त्याविरोधात निलेश चव्हाण याने तत्कालीन गृहराज्य मंञा सतेज पाटील यांच्या कार्यालयात अपील केलं  त्यावर सुनावणी होऊन जून 2022 रोजी थेट मंञालयातून निलेश चव्हाण ला शस्र परवाना देण्यासाठी पुणे पोलिसांना लेखी निर्देश दिले.