#

Advertisement

Friday, June 13, 2025, June 13, 2025 WIB
Last Updated 2025-06-13T12:49:10Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'महाजनको' आणि 'एमपीएससी'ची परीक्षा एकाच दिवशी

Advertisement

विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम ; नेमकी कोणत्या परीक्षेसाठी जावे

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) संयुक्त मुख्य परीक्षा 2024 आणि महाजनको (महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी मर्यादित या दोन्ही विभागाच्या भरती परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही विभागाच्या परीक्षा 29 जूनलाच असल्याने नेमकी कोणत्या परीक्षेसाठी जावे, या संभ्रमात विद्यार्थी आहेत.
महजनको रसायनशास्त्रज्ञ संवर्गातील विविध पदांसाठीची सरळसेवा भरती परीक्षा 29 तारखेला आहे. या विभागातील कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ आणि कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ या पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी एमपीएससी गट ब मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. सुरुवातीला ही परीक्षा 5 जूनला होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पुन्हा परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले त्यामुळं महाजनकोने परीक्षेच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांना दोन्ही विभागाच्या परीक्षा द्यायच्या आहेत. मात्र दोन्ही परीक्षांच्या तारख्या एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांची संधी हुकणार आहे. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेची तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सरकार आणि महाजनकोने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमपीएससीने मार्चमध्येच 29 जून ही तारीख जाहीर केली होती. हे माहित असूनही महाजनकोने त्याच दिवशी परीक्षा ठेवली, असा दावा विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.