Advertisement
पत्नीनं केला धक्कादायक खुलासा
अहमदाबाद : गुजरातचा चित्रपट दिग्दर्शक महेश कलावाडियाला लोकं महेश जीरावाल नावानं देखील ओळखतात. तर 12 जुन रोजी अहमदाबाद एअर-इंडिया विमान क्रॅशनंतर तो कथितपणे गायब झाला आहे. त्याची पत्नी हेलतनं यानंतर एक दावा केला आहे की या विमान दुर्घटने दरम्यान, रस्त्यावर असणाऱ्या ज्या लोकांनी त्यांचा जीव गमावला आहे त्यांच्यात तिचा नवरा अर्थात महेश देखील असू शकतो. नवऱ्याची ओळख करून घेण्यासाठी तिनं DNA सॅम्पल देखील दिला.
खरंतर, 12 जून रोजी एअर इंडियाचं विमान अहमदाबादवरून लंडन जात होतं. ज्यात 242 प्रवासी प्रवास करत होते. पण टेक-ऑफ केल्यानंतर काही सेकंदातच हे प्लेन क्रॅश झालं आहे आणि मेघानीनगरमध्ये एक मेडिकल कॉलेजच्या होस्टेलमध्ये क्रॅश झालं. त्यामुळे तिथे देखील खूप गंभीर नुकसान झालं आहे आणि या प्लेन क्रॅशमध्ये 29 लोकांनी त्यांचा जीव गमावला. आता पोलिस या हत्येत ज्यांनी जीव गमावला आहे त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.