Advertisement
मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घटनात्मक अधिकारांची गळचेपी करत देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. इंदिरा गांधींच्या या निर्णयाला आज (25 जून) 50 वर्ष झाली. त्या काळात राष्ट्रीय अणीबाणीला विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचा समावेश होता. अणीबाणी लागू करण्याच्या घटनेला 50 वर्ष झाल्याच्या निमित्तानं मुंबईतील दादरमध्ये कामगार संघटनांच्या संयुक्त मेळावा झाला. या मेळाव्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या वेगवेगळ्या आठवणी सांगितल्या. त्याचबरोबर देशातील सध्याच्या परिस्थितीवरही एक गंभीर वक्तव्य केलं.
शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले की आपण आज जॉर्ज यांचं स्मरण करतोय कारण त्यांनी देशाची अखंड सेवा केली. अणीबाणी होती त्यावेळेसची परिस्थिती माहिती आहे. पण, नंतर इंदिरा गांधी यांनी देशाची क्षमा मागितली. देशानं त्यांना पुन्हा संधी दिली.
आज पुन्हा सावध राहण्याचा काळ आहे. आपलं मत मांडत असेल ते सरकारच्या विरोधात असेल किवा बातमी विरोधात छापली किवा चालवली गेली की तर संबंधितांनी फोन येतात. आज अघोषित अणीबाणी आलेली आहे अस मला वाटतं, असा आरोप पवार यांनी यावेळी केला.
काँग्रेसमध्येही होती अस्वस्थता
शरद पवार यांनी यावेळी सांगितलं की अणिबाणीचा कालखंड वेगळा होता. त्यावेळी काँग्रेसमध्येही मोठा वर्ग अस्वस्थ होता. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले. काँग्रेसमचे दोन पक्ष झाले. इंदिरा काँग्रेसमधून बाहेर पडून काँग्रेस एस पक्ष अस्तित्वात आला, असं पवार यावेळी म्हणाले.