#

Advertisement

Friday, June 27, 2025, June 27, 2025 WIB
Last Updated 2025-06-27T12:30:55Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आमदार नाराज, अजित पवारांची डोकेदुखी वाढणार?

Advertisement

अहिल्यानगर : जिल्ह्यातून प्रतिनिधी असणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मागील दोन आठवड्यात अल्पसंख्यांक समुदायाच्या विरोधात आणि कट्टर हिंदुत्वाची भूमिका मांडली आहे. संग्राम यांची कृती अजित पवारांची डोकेदुखी वाढवणार आहे असं म्हटलं जात आहे. वास्तविक संग्राम जगताप हे गेले काही दिवस वेगवेगळ्या कारणावरून नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी मुंबईत मंगळवारी नेहमीप्रमाणे सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला जगताप गैरहजर राहिले.


राष्ट्रवादीतील माजी आमदार नाराज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माजी आमदार नाराज असल्याटची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे हे आमदार पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षातील कोणत्याच बैठकीत आपल्याला बोलवत नाही आणि कोणतीच जबाबदारी पक्षातून दिली जात नाही, अशी खंत माजी आमदारांकडून व्यक्त होते. पक्षात नवीन येणाऱ्या माजी आमदारांचा मान-सन्मान केला जातो. पण पक्षाच्या अडीअडचणीच्या काळात पक्षाच्या सोबत असलेल्या माजी आमदारांना अशी वागणूक का?असा सवाल या माजी आमदारांचा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.