Advertisement
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय लवकरच घेतली जाईल असे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का याबद्दल प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी सकारात्मक संकेत दिले आहेत. खरोखरच असं झालं तर 19 वर्षानंतर पहिल्यांदाच दोन्ही सेना एकत्र आल्याचं पाहायला मिळणार आहे. दरम्यान, खरोखरच ठाकरे बंधू एकत्र आले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का ठरेल, शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक मातब्बर पुन्हा या दोन्ही बंधूंकडे परतण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मनसे-शिवसेनेच्या युतीची चर्चा रंगली असून ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीसाठी आपण एक पाऊल पुढे टाकायला तयार असल्याचं सांगितल्यानंतर या चर्चांना सुरुवात झालेली. दोन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्तेही युतीसाठी अनुकूल असल्याचं सांगितलं जात आहे. यादरम्यान आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर मोठं विधान करत सकारात्मक संकेत दिलेत. "जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईलच," असं सांगत उद्धव यांनी एकाप्रकारे युतीला हिरवा कंदिला दाखवला आहे. आता दोन्ही ठाकरे एकत्र येणे हे शिंदेंच्या सेनेसाठी निवडणूक अधिक अवघड करु शकतं, आले तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का ठरेल,
