#

Advertisement

Wednesday, July 2, 2025, July 02, 2025 WIB
Last Updated 2025-07-02T13:12:05Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धनुष्यबाण कोणाचा ? 16 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी

Advertisement

मुंबई :  शिवसेनेच्या चिन्हासाठी ठाकरे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ठाकरे गटाकडून आज पुन्हा एकदा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात मेन्शन करण्यात आलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रकरण प्रलंबित आहे. प्रकरण लवकर बोर्डावर घ्या अशी मागणी आता ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता येत्या 16 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
धनुष्यबाण कोणाचा यावर येत्या 16 जुलैला सुनावणी होणार आहे, ठाकरेंच्या वकिलांनी स्थानिक निवडणुकांचा हवाला देत चिन्हावर सुनावणीची मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केला आहे. मात्र दुसरीकडे तातडीच्या सुनावणीला शिवसेना शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्याचा मुद्दा शिवसेना शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. यावर न्यायाधिशांनी येत्या 16 जुलैला सुनावणी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 17 फ्रेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदे गटाचा चिन्हावरील दावा मान्य केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. यावर आता 16 जुलैला सुनावणी होणार आहे.
दरम्यान त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर देखील दावा करण्यात आला होता. 17 फ्रेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदे गटाचा चिन्हावरील दावा मान्य केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे.