Advertisement
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंसंदर्भात मोठा दावा
मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा वैयक्तिक प्रश्न आहे. शेवटी घर, बंधुत्व आहे. कोणी कुठं जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. दोघं सोबत राहून भविष्य असतं तर ते वेगळे झाले नसते. सत्ताधारी पक्षांकडे 235 आहे, हे काय करणार? यांना आता मराठी माणूस आठवला आहे, राज ठाकरेंनी शिवसेनेत यावं असं उद्धव ठाकरे कधीच म्हणणार नाहीत. कारण यांचं अस्तित्व राहणार नाही. राज शिवेसनेत गेले तर तेच प्रमुख होतील आणि उद्धव ठाकरे नगण्य होतील. त्यामुळे ते स्वत:हून बोलवणार नाहीत.अशी टीका नारायण राणेंनी केली आहे.
आतापर्यंत त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं आहे? मराठी माणसाची मुंबईत फक्त 18 टक्केवारी आहे. 1960 मध्ये 60 टक्के मराठी लोक होते. मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी असं शिवसेना म्हणायची. मग हे मराठी कुठे गेले? उद्धव ठाकरे अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात आले. त्यांनी महाराष्ट्र, मराठी, मराठी तरुणांसाठी, नोकरीसाठी काय केलं?, अशी विचारणा त्यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंना मराठी आणि हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
रोधकांमध्ये सरकारला घेरण्याची ताकद नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. "आता मराठीचा पुळका आला असताना, मुलांना इंग्लिश मीडियममध्ये का शिकवलं? मुलाला बॉम्बे स्कॉटिशमध्ये का पाठवलं? मुख्यमंत्र्यांनी त्याचा संदर्भ घेऊन उदारहण दिलं आहे. फक्त दोन भाऊ सगळे भाऊ एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आधीही एकत्र होते ना. आमच्याकडे 235 आमदार आहेत. आम्ही यांची गणना करत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.