#

Advertisement

Monday, July 7, 2025, July 07, 2025 WIB
Last Updated 2025-07-07T11:32:46Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शाळा 8 आणि 9 जुलैला बंद राहणार नाहीत

Advertisement


शिक्षण विभागाने केलं स्पष्ट 
मुंबई : राज्यातील शिक्षक समन्वय संघाने राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण राज्यातील शिक्षण विभागाने आदेशात स्पष्ट केले आहे की, 8 जुलै मंगळवार आणि 9 जुलै बुधवारी राज्यातील शाळा बंद राहणार नाही.  माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक महेश पालकर यांनी हा आदेश काढला आहे. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे की, 8 आणि 9 जुलैला शाळा असणार आहे.
राज्यातील विविध शाळांमधील हजारो शिक्षक मुंबईतील आझाद मैदानात एकत्र येत सरकारचे लक्ष वेधणार आहे. पावसाळी अधिवेशन असल्याने मुंबईत येऊन सरकारला आपली नाराजी शिक्षण व्यक्त करणार आहेत.
गेल्या वर्षी, अनुदानित शाळांसाठी वाढीव आर्थिक अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी 1 ऑगस्ट 2024 पासून 75 दिवस राज्यव्यापी निदर्शने केली. सरकारने त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. पण 14 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केलेल्या अधिकृत सरकारी ठरावात (जीआर) निधी वाटप करण्यात त्यांनी अपयशी ठरले, त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे.
10 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनुदानित शाळांना अनुदानाचा पुढील हप्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, एक वर्षानंतरही मागण्या पूर्ण न झाल्याने शिक्षक संघटनेने पुन्हा एकदा संपाचं हत्यार हाती घेतलं आहे.