#

Advertisement

Tuesday, July 22, 2025, July 22, 2025 WIB
Last Updated 2025-07-22T13:06:14Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्रातील दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचा आरोप

Advertisement

नाशिक हनी ट्रॅप प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट 

मुंबई : महाराष्ट्रातील दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचा आरोप झाला आहे. नाशिक हनी ट्रॅप प्रकरणातील महिलेनं दोन पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचा आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे. करूणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पीडितेची बाजू मांडली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच तापला. पत्रकार परिषदेत करूणा मुंडे यांनी या महिलेची बाजू मांडली. आपल्यावर 2 पोलीस अधिकाऱ्यांनी बलात्कार केला. 
याबाबत तक्रार करायचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी आपल्यासह आपल्या मुलीवरही गुन्हा दाखल केल्याचा आरोप महिलेनं केला. त्या 2 पोलीस अधिका-यांनी मुंबईतील घाटकोपरमध्ये टू बीएचके फ्लॅट घेतलाय. त्याठिकाणी बांगलादेशी महिला आणतात आणि दारू पार्टी करून त्यांचा वापर करतात असा आरोपही पीडितेनं केला आहे.  
दरम्यान, हनी ट्रॅपमध्ये अनेक अधिकारी आणि राजकीय नेते अडकले असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला होता. त्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले होते.. ना हनी ना ट्रॅप आहे असं उत्तर फडणवीसांनी दिलंय.. हनी ट्रॅपमध्ये कुणीह अडकलं नसल्याचं फडणवीस म्हणालेत... नाना पटोलेंनी टाकलेला बॉम्ब आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे. 


हनीट्रॅप प्रकरण नाशिकपासून अकोल्यापर्यंत सरकारच्या वेगवेगळ्या विभागात सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्याला अधिकृत दुजोरा मात्र कोणीही देत नाही. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. विधानसभा अध्यक्षांनीही सरकारला नाना पटोलेंनी जो दावा केलाय त्या दाव्यातील तथ्य तपासण्याचे आदेश दिले.