#

Advertisement

Tuesday, July 22, 2025, July 22, 2025 WIB
Last Updated 2025-07-22T14:20:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

फडणवीस यांच्या कामाचा वेग आफाट : पवारांनी केले कौतुक !

Advertisement

मुंबई : खासदार शरद पवार यांनीही शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. फडणवीस यांच्या कामाचा वेग आफाट आहे असे म्हणत फडणवीसांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो, अशी स्तुतीसुमनं शरद पवारांनी फडणवीस यांच्यावर उधळली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र नायक’ पुस्तकात वेगवेगळ्या नेत्यांनी फडणवीस यांच्या कार्याबद्दल मतं व्यक्त केली आहेत. तसेच फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. याच पुस्तकात शरद पवार यांनीदेखील फडणवीस यांच्याविषयी मत व्यक्त केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट आहे. फडणवीसांचे कष्ट पाहून, ते थकत कसे नाहीत? असा प्रश्न पडतो, अशा शब्दांत शरद पवारांकडून फडणवीसांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो. देवेंद्र फडीसांचीदेखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धींगत होत राहो, असे फडणवीसांचे अभिष्टचिंत शरद पवार यांनी केले.तसेच, देवेंद्र फडणीस हे कायद्याचे पदवीधर असल्याचे पट्टीचे हजरजबाबी, संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धीचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानादेखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी होती, अशी स्तुतीसुमनंही शरद पवार यांनी फडणीसांवर उधळली.