Advertisement
जळगाव : जळगावच्या धानोरा येथील आदिवासी मुलांच्या आश्रम शाळेला आदिवासी विकास प्रकल्प अधिका-यांकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसह त्यांच्या सुरक्षा तसेच आरोग्याकडे संस्थाकडून पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा ठपका आश्रमशाळेवर ठेवण्यात आला. या प्रकरणी तीन दिवसात स्पष्टिकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदिवासी विकास प्रकल्प अधिका-यांकडून या आश्रमशाळेची पाहणी करण्यात आली होती. त्यात शाळेतील अस्वच्छतेसह अनेक गंभीर बाबी आढळून आल्या होत्या. शाळेत विद्यार्थ्याचे स्नानगृह तसेच शौचालयांमध्ये प्रचंड अस्वच्छता, जेवणाचा दर्जा चांगला नसणे, पिण्याच्या पाण्याजवळ शेवाळ आणि घाणीचे साम्राज्य यासह विविध समस्या आढळून आल्या होत्या. दरम्यान तीन दिवसात स्पष्टिकरण न दिल्यास आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा अधिका-यांनी दिला.