#

Advertisement

Friday, July 25, 2025, July 25, 2025 WIB
Last Updated 2025-07-25T12:42:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांना लवकर डच्चू ?

Advertisement

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान अनेक मोठे आणि दिग्गज नेते फडणवीस यांच्या भेटीला पोहोचत आहेत. त्यासोबत गृहमंत्री अमित शाह यांच्याही भेटीला अनेक नेते मंडळी पोहोचत आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार अशी चर्चा रंगली आहे. त्यातच महायुतीतील 8 मंत्र्यांना लवकरच डच्चू देण्यात येणार असा दावा सामना या वृत्तपत्रातून करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठं यश मिळालं खरं पण सरकार स्थापनेनंतर अनेक मंत्री आणि आमदार हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तनामुळे प्रकाशझोतात आले. या काही मंत्री आणि आमदारांमुळे सरकारची प्रतिमा गेल्या काही दिवसांमध्ये डागाळली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमात काही मंत्र्यांची कामगिरीवर आपण समाधानी नसल्याचं म्हटलं. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होतील, असं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. 

यांना सोडावे लागणार मंत्रीपद ?
सामनातून करण्यात आलेल्या दावानुसार मंत्री भरत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे, गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट या शिंदे गटातील मंत्र्यांना नारळ मिळणार आहेत, असं म्हटलं जातंय. तर अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख प्रकरणात आधीच राजीनामा दिला आहे. त्यानंतर सातत्याने वादग्रत ठरलेले माणिकराव कोकाटे आणि  नरहरी झिरवळही हिटलिस्टवर आहेत. भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वर्तन समोर आलं आहे. त्यामुळे त्यांचीही विकेट जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.