Advertisement
शिंदेंच्या मंत्र्याविरोधात जनआक्रोश, मनसेचा मोर्चा चिघळला
मुंबई :मीरा-भाईंदरमध्ये मनसेने भव्य मोर्चा काढला. या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने लोक सामील झाले होते. यावेळी शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा मोर्चात सहभागी झाले होते. पण त्यांना तिथे नकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रताप सरनाईक मोर्चाच्या ठिकाणी येताच जय गुजरातच्या तसेच गो बॅक… गो बॅक… प्रताप सरनाईक गो बॅक… घोषणा देण्यात आल्या.
मनसेने भव्य मोर्चा काढला. सुरुवातीला या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मनसे कार्यकर्त्यांच अटक सत्र सुरु होतं. पण हळूहळू जनमताचा रेटा वाढत गेला. मनसे मोर्चावर ठाम राहिली. अखेर पोलिसांना मोर्चाला परवानगी द्यावी लागली. या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने लोक सामील झाले होते.
पत्रकारांनी प्रताप सरनाईक त्यांना विचारलं, तुम्ही आल्यावर जय गुजरातच्या घोषणा दिल्या. त्यावर प्रताप सरनाईक म्हणाले की, “राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. माझ्यासोबत मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आहेत. त्यामुळे बाकीच्यांना जे काय राजकारण करायचय ते करुं दे. प्रताप सरनाईक मीरा-भाईंदरमधील मराठी जनांच्या पाठिमागे ठामपणे उभा आहे.
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये सोडवण्यासाठी मी आलो होतो. मराठी बांधवांना आणि मीरा-भाईंदरमधील मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलो होतो, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
