#

Advertisement

Wednesday, July 30, 2025, July 30, 2025 WIB
Last Updated 2025-07-30T17:41:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अजितदादांच्या स्नेहभोजनाला शिंदेची सेना गैरहजर

Advertisement

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित स्नेहभोजनाला शिवसेनेच्या मंत्र्यांनी दांडी मारली. केवळ एकनाथ शिंदेच या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आल आहे.
राज्यातील सत्ताधारी महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याचं दिसत आहे. पालकमंत्रीपद, निधी वाटपाचा मुद्दा आणि खात्याच्या अधिकारावरून महायुतीमध्ये आधीच फटाके फुटत आहेत. त्यात आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील धुसफूसही समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याकडे शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांनी पाठ फिरवली. शिवसेनेकडून केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच उपस्थित होते. भाजपचे मंत्री आणि आमदारही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, शिंदे सोडता एकही मंत्री आणि आमदार उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सध्या अनेक मुद्यांवरून मतभेद सुरू आहेत. अशा वेळी अजित पवारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते अलिप्त राहिल्याने महायुतीत ऑल इज नॉट वेल बोललं जात आहे.