Advertisement
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्ताने संवेदनशील ते संकल्प या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. गाड्यांचे शोरूम असतात तसे परदेशात महिलांचे शोरुम असतात, असं वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.
मानवी तस्करी टाळण्यासाठी आपण मोहिम हाती घेतली आहे. जनजागृती मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे. तस्करीच्या यंत्रणेवर घाव घातला पाहिजे. गेल्या दोन वर्षांत मस्कत, दुबईतून महिलांना परत आणण्यात यशस्वी झालो. 24 महिलांना आपण परदेशातून परत आणलं. गाड्यांचे शोरूम असतात तसे परदेशात महिलांचे शोरुम असतात, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
मानवी तस्करीच्या माध्यमातून मिसिंग केसेसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवणं, नोकरीच्या जाळ्यात अडकवणं, बाल कामगार, पुरुष देखील मानवी तस्करीत असू शकतो. यासंदर्भात आम्ही मोहिम हाती घेतली आहे, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.