#

Advertisement

Monday, July 28, 2025, July 28, 2025 WIB
Last Updated 2025-07-28T12:02:22Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

रोहिणी खडसेंच्या पतीला अटक : रूपाली चाकणकर म्हणतात...

Advertisement

पुणे :  खराडी परिसरात एका हायप्रोफाइल रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू आणि हुक्का जप्त केले आहेत. या पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाला म्हणजेच रोहिणी खडसेंच्या पतीला अटक करण्यात आली. यानंतर राजकीय वातावरण तापलंय. एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंच्या विरोधकांनी या प्रकरणावरुन त्यांच्यावर निशाणा साधलाय. यात आता रुपाली चाकणकरांनी रोहिणी खडसेंवर निशाणा साधला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावर टीका केलीय. स्वतःवर प्रसंग ओढवला तर वेळ कळते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यांनी आपल्या राजकारणासाठी अनेक पीडीतांचे भांडवल केले आहे, त्यातून त्यांनी राजकीय पोळी भाजून घेतल्याचे रुपाली चाकणकर म्हणाल्या. न्यायप्रविष्ठ प्रकरणात परिणय फुके सह अन्य प्रकरणांचं भांडवल केलं. यांना न्यायप्रविष्ठ ही बाब ही कळते की नाही हा प्रश्नच असल्याचे त्या म्हणाल्या  आहेत. 

कोण आहेत प्रांजल खेवलकर?
प्रांजल खेवलकर हे महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. ते एकनाथ खडसे यांच्या दुसऱ्या कन्या, रोहिणी खडसे-खेवलकर यांचे पती आहेत. गिरीश दयाराम चौधरी एकनाथराव  खडसे यांचे मोठे जावई आहेत. गेले अडीच वर्षापासून ईडीच्या कारवाई निमित्त त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे. प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसेंचे दुसरे जावई आहेत.