Advertisement
शिवसेनेतील इनकमिंगला ब्रेक
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसले.यातून भविष्यातील संभाव्य युतीची चर्चा होऊ लागली. याचे राजकीय परिणामही दिसू लागले आहेत. ठाकरे बंधूंच्या एकीकरणाच्या चर्चेनं शिंदेंच्या शिवसेनेतील इनकमिंग थंडावल्याची चर्चा आहे. 40 दिवसांपासून मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेत एकही पक्षप्रवेश झालेला नाही. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकीमुळे एकनाथ शिंदेंना मुंबईत मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पार्श्वभूमीवर महायुतीनं ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे धक्के दिले होते. ठाकरेंच्या अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, मागील 40 दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत एकही पक्षप्रवेश झालेला नाहीये. काही माजी नगरसेवक शिंदेंकडून ठाकरेंकडे परतीच्या वाटेवर असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे लागणारी प्रवेशाची रांग कमी होत असल्याची देखील चर्चा आहे.