#

Advertisement

Wednesday, July 16, 2025, July 16, 2025 WIB
Last Updated 2025-07-16T11:49:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक सल्ला

Advertisement

मनसैनिकांना सैन्यात पाठवा 
मुंबई :  शिवसेना आणि मनसेने मराठी भाषेच्या मुद्दा उचलल्यानंतर राज्यात काही ठिकाणी हिंसात्मक घटना घडल्या असून, वाद आणखी पेटला आहे. यादरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना खोचक सल्ला दिला दिला आहे. मराठी भाषेच्या नावाखाली राज ठाकरेंनी दादागिरी करू नये. दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवावं असं रामदास आठवले म्हणाले आहेत. सांगलीच्या वाळवा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 
मराठी ही आपली भाषा आहे, पण एखाद्याला मराठी येत नसेल तर त्याला मराठी बोलण्याबाबत सक्ती करू नये. देशाच्या अनेक राज्यात मराठी बांधव राहतात, त्यामुळे राज ठाकरेंनी मराठी भाषेच्या नावाखाली कोणावरही दादागिरी करू नये आणि दादागिरी करायची असेल तर त्यांच्या मनसैनिकांना लष्करात पाठवावं, असा खोचक सल्ला रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.  

मराठी भाषेच्या अस्मितेच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आता ते भविष्यातील निवडणुकीसाठी राजकीय युती जाहीर करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी वरळीमधील मेळाव्यात एकत्र राहण्यासाठी आलो आहोत असं सांगत भविष्यातील युतीचे संकेत दिले होते. पण त्यानंतर दोन्ही ठाकरेंनी कोणतंही अधिकृत भाष्य केलेलं नाही. दरम्यान मनसेचं तीन दिवसीय शिबीर सुरु झालं असून यामध्ये राज ठाकरेंनी युतीवर भाष्य केलं आहे.