Advertisement
एकनाथ शिंदेंनी केली रिपब्लिकन सेना पक्षा हात मिळवणी
मुंबई : ज्याच्या राजकारणात आणखी एक युती झाली आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना पक्षाने अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. एकनाथ शिंदे आणि प्रकाशराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि रिपब्लिकन सेना पक्ष युती करत असल्याची अधिकृतपणे घोषणा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी विकास, विश्वास हाच आमचा अजेंडा असल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात झालेली ही युती आजची नाही, तर बाबासाहेबांपासून, प्रबोधनकार ठाकरेंपासून सुरुवात झालेली युती आहे. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही दोन कार्यकर्ते एकत्र आला आहोत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असतानाही सर्वसामान्यांच्या सुखदुखाशी एकजूट होण्याचा प्रयत्न केला. अशा या कार्यकर्त्याबरोबर या देशामधील, महाराष्ट्रामधील आंबेडकरी समाज आहे. जो अनेक वर्षं रस्त्यावरील लढाई लढत आला. पण स्थानिक निवडणुकीत आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही दोघांनी एकत्र येण्याचं ठरवलं, असं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं.
ते म्हणाले की, इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याचा आनंद आहे. महाराष्ट्रातून सामाजिक, राजकी जीवन ढवळून निघाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. त्यांचे विचार आणि आमचे विचार असं काहीजण म्हणतील. त्यांना मी सांगेन की, देशातील प्रत्येक माणूस बाबासाहेबांचे विचार आणि राज्यघटनेवर चालतो. त्यामुळे त्यांच्या आणि आमच्या विचारात काही वेगळेपण असण्याचा प्रश्न नाही. आमचे विचार वेगळे असणार नाहीत. यांच्यासोबत महाराष्ट्रात गेल्यावर एक चमत्कार आणि दिनदुबळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल यामुळे सोबत आलो आहोत. कुठल्याही अटी न टाकता त्यांच्यासोबत जाण्याचं ठरवलं आहे. आंबेडकरी कार्यकर्त्यांना आपण सत्तेमध्ये सामून घ्यावं इतकंच सांगितलं असून, त्यांनी शब्द दिला आहे. त्यामुळेच ही युती होत आहे.
आपल्या सर्वांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही सेना आहेत आणि रस्त्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आणि दुसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. त्यामुळे आमचं चांगलं जमेल. मुख्यमंत्री असतानाही मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं. आधी मी CM म्हणजे कॉमन मॅन होतो. पण आता मी DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे,असं एकनाथ शिंदे म्हणाले.
