Advertisement
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनामध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे.
बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपसमारंभाप्रसंगी जोरदार टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं होतं. फडणवीस यांनी यावेळी विधानभवनात बोलताना उद्धव ठाकरे यांना थेट सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. तुम्हाला इकडे स्कोप आहे, तुम्ही येऊ शकता, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान फडणवीसांच्या या ऑफरनंतर आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आल्याचं पाहायला मिळालं.
आज उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, या भेटीला आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना ‘हिंदीची सक्ती हवीच कशाला’ हे पुस्कत देखील भेट दिलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार विरोधी पक्ष नेतेपद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदीसक्ती या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली आहे.
