Advertisement
इटलीवरुन टीम आली : प्रत्येकाला वाटेल अभिमान
कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पलचे मॉडेल प्राडाने कॉपी केल्याची टीका होताच प्राडा कोल्हापुरी चपलांसाठी पुढे सरसावली आहे. इटली वरून प्राडाची सहा जणांची टीम कोल्हापुरात दाखल झालीये. या टीमनं कोल्हापुरातील चप्पल लाईनला भेट दिली. त्याचबरोबर कोल्हापुरी चपलेची वैशिष्ट्य, बनवताना लागणारी अस्सल कारागिरी या सर्वांची माहिती घेतली.
जगात भारी कोल्हापुरी असं आपण कौतुकाने म्हणतो. इटालियन कंपनी प्राडानंही आता हे मान्य केलंय. प्राडालाही कोल्हापुरी चपलेची भुरळ पडलीये. कोल्हापुरी चपलेवरून निर्माण झालेल्या वादानंतर प्राडाच्या काही सदस्यांनी थेट कोल्हापूर गाठलं. नुसतं कोल्हापूर गाठलं नाही तर कोल्हापुरी चप्पल बनते कशी?, कलाकुसर कशी केली जाते?, अशी एकूण एक माहिती जाणून घेतली. बरं प्राडाचे सदस्य इतक्यावरच थांबले नाहीत तर जिथं कोल्हापुरी चप्पल विकली जाते त्या दुकानांना भेट देत तेथील व्यावसायिकांशीही संवाद साधला. दुकानांमधील कोल्हापुरी चपलेचे विविध प्रकार पाहून प्राडाचे सदस्य थक्क झाले. प्राडाच्या या कोल्हापूर दौ-यानंतर प्राडा आणि कोल्हापुरी चपलेचा वाद आता निवळण्याची शक्यता आहे.
