#

Advertisement

Thursday, July 17, 2025, July 17, 2025 WIB
Last Updated 2025-07-17T11:36:32Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज्य सरकारनेच लाडकी बहिण योजनेचे पोर्टल बंद पाडले : हिराताई खडसे

Advertisement

बहुजन रयत परिषदच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

वर्धा - बहुजन रयत परिषद महिला आघाडीच्या अध्यक्षा हिराताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वर्धा बहुजन रयत परिषदेचे अध्यक्ष अजय डोंगरे, उपाध्यक्ष ओम बावणे, उपाध्यक्ष किशोर वाघमारे, तालुकाध्यक्ष शरलाताई डोंगरे यांच्या उपस्थित जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. भाजप युती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडकी बहिण योजना सुरु केली होती. भाजप आणि मित्र पक्षाला या योजनेचा फायदाही झाला. काहीच महिन्यात योजनेत फेरबदल करण्यात आला, अटी शर्ती लागू करून काही लाडक्या बहिणींना योजनेच्या लाभांपासून दुर करण्यात आले.
पुन्हा योजनेत बदल करुन ज्यांच्याकडे फोरव्हिलर गाडी असेल किंवा घरात कोणी इनकम्‌टेक्स भरत असेल, अशा घरातील लाडक्या बहिणीना या योजनेपासून वंचित केले गेले. आता तर भाजप आणि मित्रपक्ष सरकारने लाडक्या बहिणींना योजनेचा लाभच मिळू नये या करीता लाडक्या बहिणी योजनेच पोर्टलच बंद केले आहे. आता, लाडक्या बहिण नसून त्या सावत्र बहिणी झाल्या आहेत काय अशीच चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्रातील भाजप आणि मित्र पक्षाने लाडक्या बहिण योजनेचा पोर्टल त्वरित सुरू करावे अन्यथा बहुजन रयत परिषद रस्त्यावर उतरून महिलांसोबत लाडकी बहिण योजनेच खोटे आश्वासन विरोधात आंदोलन करेल यात होणाऱ्या शासकीय निमशासकीय नुकसानीला शासन जबाबदार राहिल, असा इशारा देण्यात आला आहे, निवेदन देताना बहुजन रयत परिषदेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.