Advertisement
दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. अमेरिकेच्या या आयातशुल्कामुळे भारतीय व्यापाराला मोठा फटका बसत आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवावे तसेच भारत आणि रशिया यांच्यातील व्यापार प्रभावित व्हावा हा उद्देश समोर ठेवून ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम रशियातही होत आहे.
रशियन माध्यमांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या नीतिवर सडकून टीका केली आहे. तसेच भारत हा ट्रम्प यांच्या दबावाला बळी पडणारा देश नाही, असंही मत रशियातील वृत्तपत्रांनी तेथील तज्ज्ञांच्या हवाल्याने मांडले आहे. रशियाची शासकीय न्यूज एजन्सी ‘तास’ने रशियाच्या सुरक्षा परिषदेतील वैज्ञानिक सल्लागार मंडळाचे सदस्य अँड्र्यूज सुशेनत्सोव यांना ट्रम्प यांच्या धोरणाबाबत विचारले. भारत ट्रम्प यांच्या दबावाला बळी पडून रशियासोबतचे नाते तोडू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर सुशेनत्सोव यांनी दिले आहे.
दरम्यान, येत्या 15 ऑगस्ट रोजी डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत नेमकं काय घडणार? रशिया आणि युक्रेन यांच्यात समेट घडून येणार का? समेट घडून आलीच तर भविष्यात भारतावरील टॅरिफ कमी होण्याची शक्यता वाढणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.