#

Advertisement

Monday, August 4, 2025, August 04, 2025 WIB
Last Updated 2025-08-04T13:22:04Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का ?

Advertisement

बडा नेता अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा 
धाराशिव : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. परंडा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे हे लवकरच शरद पवार यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शरद पवार यांच्या गटाला हा मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे. 
माजी आमदार राहुल मोटे यांनी आतापर्यंत पाच वेळा परंडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. त्यात सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.  भूम, परंडा आणि वाशी या तालुक्यांमध्ये त्यांचा मोठा मानणारा वर्ग आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राहुल मोटे यांनी शरद पवार यांच्या गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच गटाकडून त्यांनी निवडणूकही लढवली होती. राहुल मोटे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळचे असल्याचेही बोलले जाते. 
राहुल मोटे हे परंडा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत. त्यांनी आतापर्यंत परंडा विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडणूक लढवली आहे. मागील 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्याकडून त्यांचा अवघ्या 1,500 मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला होता.