#

Advertisement

Wednesday, August 20, 2025, August 20, 2025 WIB
Last Updated 2025-08-20T11:55:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पुणे न्यायालयाचा 'अक्षयकुमार-अर्शद वारसीला दणका

Advertisement

पुणे : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा आगामी चित्रपट ‘जॉली एलएलबी ३’ प्रदर्शनापूर्वीच वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. 19 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट वकील आणि न्यायालयाभोवती फिरणाऱ्या कथानकावर आधारित आहे. मात्र, या चित्रपटात वकील आणि न्यायाधीशांवर असभ्य आणि हलक्या पद्धतीने विनोद केल्याचा आरोप आहे. यामुळे ॲड. वाजेद खान (बिडकर) आणि ॲड. गणेश म्हस्के यांनी पुणे येथील दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पुणे येथील वरिष्ठ विभागातील 12 वे कनिष्ठ दिवाणी न्यायाधीश जे. जी. पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. न्यायालयाने चित्रपटाचे मुख्य अभिनेते अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना 28 ऑगस्ट 2025 रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली असून, आर.सी.एस. क्रमांक 878/2024 अंतर्गत निर्माते आणि कलाकारांना समन्स बजावण्यात आले आहे.
ॲड. वाजेद खान यांनी सांगितले की, चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांनी वकिलांचा गणवेश (बॅण्ड) परिधान करून प्रमोशन केले आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे वकिली व्यवसायाची प्रतिमा डागाळली गेली आहे. चित्रपटात वकिलांचा अवमान केल्याचा दावा करत याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मनाई हुकूम मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.
चित्रपटाचा टीझर 12 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित झाला असून, याआधीच अजमेर येथील वकिलांनीही चित्रपटाच्या मालिकेत न्यायव्यवस्थेचा अवमान केल्याचा आरोप केला होता. आता पुणे न्यायालयाच्या समन्समुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच कायदेशीर अडचणीत सापडला आहे. २८ ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी चित्रपटाच्या भवितव्यावर परिणाम करू शकते, अशी शक्यता आहे.