Advertisement
मुंबई : धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्री असताना त्यांना सातपुडा हा बंगला दिला गेला होता. पण मंत्रिपद गेल्यानंतरही त्यांना हा बंगला अजूनही सोडलेला नाही. मात्र मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे त्यांचा सरकारी बंगला सातपुडा सोडायला का तयार नाहीत? एकीकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री झालेले भुजबळ सातपुड्यावर राहायला जाण्यासाठी वेटिंगवर आहेत. पण दुसरीकडे धनंजय मुंडेंना काही केल्या सातपुडा बंगला सोडवत नाही. आता धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण देत खरं कारण सांगितलं आहे.
मुंबईतलं माझं घर सध्या राहण्यायोग्य नाही. त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात आहे. माझ्या विविध आजारांवरच्या उपचारार्थ मला मुंबईत राहणे गरजेचे आहे. मात्र या परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणे सध्या कठीण आहे. मी घर शोधतोय असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.
दरम्यान, मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर साधारण पंधरा दिवसांत मंत्र्यांना बंगला रिकामा करावा लागतो. त्यानंतरही बंगला रिकामा केला नाही तर मंत्र्याकडून दंड आकारला जातो. धनंजय मुंडेंनी बंगला सोडला नसल्यानं आतापर्यंत त्यांना ४२ लाखांचा दंड झाला आहे. मात्र हा दंड वसूल करायचा की माफ करायचा याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो.